…तर जयंतरावांना ईश्वराला शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य मागावं लागेल – मुनगंटीवारांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवल्या नंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यांच्या या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल,अशी उपरोधिक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

मुनगंटीवार म्हणाले, जयंत पाटलांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही. पवार साहेबांचंच कुटुंब फार मोठं आहे. या कुटुंबाला संधी देता-देता जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल.

जयंत पाटील नक्की काय म्हणाले?

दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आपण म्हटल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like