मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. सदर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. मात्र, भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. उद्या माझ्याही घरावर पडू शकतो. आपण स्वच्छ असल्यास घाबरायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.
आपण स्वच्छ आल्यास ईडीला घाबरायचे कारण नाही. प्रताप सरनाईक स्वच्छ असतील तर त्यांनी ईडीला घाबरायचे कारण नाही. छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. माझ्याही घरावर छापा पडला तर मी स्वच्छ असेल तर घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. सरनाईक यांच्या घरावर मारण्यात आलेला छापा हे केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यावर दानवे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. (ED raids)
सरकार येणार याचं नियोजन कसं सांगू?
येत्या दोन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा दानवे यांनी काल केला होता. त्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता दोन महिन्यात सरकार येईल. पण सरकार कसं येईल याचं नियोजन तुम्हाला कसं सांगू?, असंही ते म्हणाले.
सरनाईक, वायकर फक्त मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये'; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/0a6dZAlE31@NiteshNRane @CMOMaharashtra @ShivSena #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
ईडी' एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय!- संजय राऊत
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/4mUJI7jYPe@rautsanjay61 @ShivSena @BJP4Maharashtra @narendramodi @AmitShah #ED #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग- छगन भुजबळ
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/1p2kkA8G7f@ChhaganCBhujbal @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @narendramodi @NCPspeaks @ShivSena #operationlotus #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’