हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच कोल्हापुरात शिवसेनेची मतेही भाजपलाच मिळतील कारण ती हिंदुत्त्वाची मते होती असा दावा त्यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीस म्हणाले, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे. वर्षानुवर्षे शिवसेना इथे निवडून आली आणि भाजप त्याना साथ देत होती. त्यामुळे आमच्या विचारांना मानणारा हा मतदार संघ आहे . राजकारणात ‘पोलिटिकल अरिथमेटक’ चालत नाही. तर पोलिटिकल केमिस्ट्री चालते. इथल्या मतदाराची ‘पोलिटिकल केमिस्ट्री’ पूर्णपणे बदलली आहे. मतदार शिवसेनेचा आहे म्हणून काँग्रेसला मतदान करेल, असं अरिथमेटिक लावले जात आहे. पण तो आता लागणार नाही. पोलिटिकल केमिस्ट्री भाजपच्या बाजूने आणि भगव्याच्या बाजूने आहे, त्यामुळे या मतदारसंघात सत्यजित नाना कदम यांचाच विजय होईल. असे फडणवीस यांनी म्हंटल.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/551011343088131/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C
ते पुढे म्हणाले, शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर छद्म धर्मनिरपेक्ष झाली आहे. जेव्हा शिवसेनेच्याच एका पदाधिकाऱ्याकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला, तेव्हाच शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेली आहे, हे स्पष्ट झालं, असा टोलाही फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा असून भाजप या घटनेचा निषेध करतो, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली.