भाजप-मनसे युती होणार का? रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपचे कौतुक करीत महाविकास आघाडीवर टीका केली. त्यानंतर आता मनसे व भाजपमध्ये युती होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. अशात आता भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजप व मनसेच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. “राज ठाकरेंनी त्यांचे परप्रांतीयांबद्दलचे धोरण बदलालावे. त्यांनी ते बदलल्यास भाजपा-मनसे युती होणार ही शक्यता नाकारता येत नाही, असे दानवे यांनी म्हंटले आहे.

मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मनसे व भाजप युतीबाबत चर्चाना अधिकच उधाण आले आहे. या दरम्यान मंत्री दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत मनसे व भाजप युतीबाबत आपली भूमिका मंडळी. यावेळी दानवे म्हणाले की, मनसे भाजपसोबत येणार का हे सांगणे व काळाच्या पोटात काय आहे, हे आता कळणे कठीण आहे. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांच्या पोटात दुखत आहार मात्र, नक्की आहे.

रथ ठाकरे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोललेत तर आघाडीमधील नेत्यांना चांगले वाटते. मात्र, जर त्यांच्याविरोधात बोलले तर मात्र त्यांच्या पोटात दुखते. राज ठाकरेंनी त्यांचे परप्रांतीयांबद्दलचे धोरण बदलल्यास भाजपा-मनसे युती होणार ही शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा वेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष सोबत येतात, तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात, असेही शेवटी दानवे यांनी सांगितले.