2024 लोकसभेला भाजप किती जागा जिंकणार? नाना पाटेकरांनी सांगितला आकडा

Narendra Modi Nana Patekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) अवघ्या काही महिन्यावर आली असून देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे 2024 लोकसभेला देशात NDA Vs INDIA अशी लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वीच निवडणुकीबाबत वेगवेगळे सर्वे सुद्धा यायला लागलेत. देशात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल असा सर्वे सगळीकडे फिरत आहे. त्यात आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचाही एक विडिओ व्हायरल होत असून भाजप 350 ते 375 जागा जिंकले असं सदर व्हिडिओत नाना पाटेकर म्हणत असल्याचे दिसत आहे.

काय आहे विडिओ मध्ये –

या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता, एक पत्रकार जेव्हा नाना पाटेकर याना विचारात आहे कि, 2024 च्या लोकसभा निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांकडे कशा पद्धतीने पाहतात? यावर उत्तर देताना अतिशय बिनदास्तपणे नाना सांगत आहेत कि, भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात येतील. कोणत्या येतील ते माहित नाही, परंतु तुमच्याकडे पर्याय नाही. आणि भाजपने इतकं चांगलं काम केलं आहे कि 350 ते 375 जागा जिंकल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही असे उत्तर नाना पाटेकर यांनी दिले.

दरम्यान, एबीपी-सी व्होटर ओपिनियन पोलनुसार, जर सध्याच्या घडीला देशात लोकसभा निवडणुका झाल्या तर एकूण 543 जागांपैकी भाजपप्रणीत NDA आघाडीला 295 ते 335 जागा मिळतील तर विरोधकांच्या INDIA आघाडीला 165 ते 205 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतराना 30-35 जागा मिळतील. उत्तर भारतात भाजप 180 पैकी 160 जागा आरामात जिंकेल, परंतु दक्षिण भारतात मात्र भाजपला फटका बसेल. याठिकाणी 132 जागांपैकी 20-30 जागाच भाजपच्या पदरात पडतील असा अंदाज सर्व्हेत समोर आला आहे. तर देशाच्या पूर्वेकडील राज्यात भाजप 153 जागांपैकी 80-90 जागांवर जिंकू शकते आणि पश्चिम भारतात 45 -55 जागांवर पक्षाला यश मिळेल असा अंदाज आहे.