हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली. काही ठिकाणी सत्ताधारी व विरोधकांच्यात काट्टे कि टक्कर अशी लढत झाली. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये तुबाल मारामारीही झाली. अशीच घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. निकालांनंतर जल्लोष करत असताना निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर धोकादायक घटना घडली आहे. दोन गटात शाब्दिक झालेलय वादानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले तर त्यांच्यातील भाजपच्या धनराज माळी या 25 वर्षीय कार्यकर्त्याला दुखापत झाली.
दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या माळी यांना इतर सहकार्यांनी नजीकच्या सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची कन्या झाली विजयी
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असल्यामुळे मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या विजयी झाल्या. मात्र, त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झाले आहे.