हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत काँग्रेसविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेगासस प्रकरणावरून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी पोलिसांची मात्र एकच धांदल उडाली. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रसाद लाड व पोलिसांमध्ये काहीवेळी वादावादी झाली. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्याच्यावतीने भाजप कार्यालयावरहल्ला करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप कार्यकत्र मात्र, चांगलेच आक्रमक झाले. परिणामी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वाखाली यूथ काँग्रेसकडून भाजपच्या कार्यालयावर पेगाससच्या मुद्यावर आंदोलन केले जात आहे. पोलिसांकडून यूथ काँग्रेसचा मोर्चा अडवला जात आहे. पेगाससच्या माध्यमातून देशातील कोणत्याही व्यक्तीची हेरगिरी केली जात आहे. राहुल गांधी, यांच्यासह देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची हेरगिरी करण्यात आली. पेगाससच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वात यूथ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत असल्याने झिशान सिद्दीकी यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.