जातीय वादविवादाच्या सर्वोच्च कमानीमध्ये अडकलेली तबलिगी जमात आणि त्यांच्या संदेशांमध्ये साथीच्या आजाराशी लढण्याच्या महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष न हटविणे हे खुप महत्वाचे आहे.
अंबरीन आगा
थर्ड अँगल | जेव्हापासून थोड्याफार प्रमाणात ज्ञात असणारा तब्लिगी समूह दिल्लीत झालेल्या धार्मिक परिषदेतनंतर, covid-१९ च्या आलेल्या सकारात्मक तपासणीमुळे प्रकाशझोतात आला आहे, तेव्हापासून तबलिगी जमातीभोवतीचे जातीय राजकारण आणखी तीव्र झाले आहे. या ध्रुवीकरणाच्या मुद्द्याच्या सूक्ष्म दृष्टिकोनासाठी जाणीवपूर्वक इस्लाम धर्मातील या विशिष्ट ट्रेंडचा इतिहास वाचण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. या समूहावर उजव्या गटाकडून झालेल्या हल्ल्यामुळे त्यांनी “आरोग्य दहशत” (health terror) प्रकरणाशी बरोबरी साधली आहे. या गोष्टीने अगदी सरकारलाही त्याचे समर्थन करण्यास उद्युक्त केले आहे. हा उत्कट सल्ला थोडा चुकला असतानाच जे लोक तबलिगी इस्लामचे अनुकरण करतात त्यांच्यामध्ये भीती निर्माण करून त्यांच्यासाठी घातकही ठरला आहे. हा उपदेशकांचा परिघीय गट पुन्हा नव्याने विश्वास निर्माण करून जे मुस्लिम यामध्ये नाहीत त्यांना खऱ्या इस्लामच्या नावाखाली मागे आणू पाहत आहे.
त्यांच्या आचरणाकडे पाहिल्यास, जेव्हा संपूर्ण जग डिसेंबर २०१९ मध्ये उद्रेक झालेल्या नोवल कोरोना विषाणूबद्दल जाणून घेत होता, तेव्हा हे अपवादात्मक तबलिगी लोक जे स्वतःला प्रापंचिक गोष्टींपासून दूर ठेवत होते, त्यांनी आधीच जे जागतिक अध्यात्मिक यात्रेनंतर कित्येक महिन्यानंतर आपल्या घरी परतत होते, अशा त्यांच्या सहप्रवाशांमध्येच या विषाणूचे संक्रमण आणि प्रसार केला होता. जे तबलिगी जमातीच्या चळवळीचे जागतिक मुख्यालय आहे, त्या निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या संमेलनात लोक एकत्र येण्याबाबत वेळेत कारवाई न केल्याबद्दल ही जमात जबाबदार आहे. नोवेल कोरोना विषाणूचा धोका अधोरेखित करण्यासंदर्भात राज्य सरकारचा निष्काळजीपणा आणि तपासण्या करण्यात झालेला उशीर या गोष्टी दुर्लक्षित होऊ शकत नाहीत. यावेळी तबलिगी जमातीने भारतातील कोरोना विषाणूचा प्रमुख वाहक बनण्यासाठी जगभर प्रवास केला होता. द्वेषाच्या प्रतिक्रिया दोन्ही अनुमानात्मक आणि अध्यापनात्मक अशा होत्या. हा वादविवाद हेच दर्शवतो. ही इस्लामफोबियाची निराधार भीती आहे आणि खोलवर रुजलेला पूर्वग्रह आहे.
इतिहास हा राजकीय कोश अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या बाबत उजव्या विचारधारेच्या लोकांचा इतर असण्याच्या तर्कांवरून विकसित झाला आहे. ज्यामध्ये त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दलचा रूढीवादी दृष्टिकोनही येतो. जसे विषाणूचे संक्रमण जातीय स्वरूपात बदलते, तसे इतिहासावर धावता दृष्टिक्षेप टाकणे महत्वाचे आहे. इतिहास हा सर्वांसाठी धडा असतो. तबलिगी जमात हि विविध देशाची एकत्रित इस्लामिक पुनरुत्थानवादी चळवळ आहे, जिची स्थापना १९२६ च्या सुरुवातीला ब्रिटिश भारतामध्ये मौलाना मोहम्मद इलियास कंधलवी यांनी केली. अशरफ अली थानवी यांनी तिचा प्रसार केला. हे दोघे या चळवळीचे कुलपीता होत. १९ आणि २० व्या शतकाच्या राजकीय लहरीपणात भारतातील मुस्लिमांवर प्रचंड राजकीय, सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रभाव होता. ज्याने ब्रिटिशाकडून धार्मिक भावना व्यक्त केल्या गेल्या. १९ व्या शतकाच्या काळात विविध प्रभावशाली आणि विवादात्मक धार्मिक सुधारणा चळवळी उदयाला आल्या होत्या. ज्यामध्ये आपला गमावलेला गौरव पुन्हा शोधण्याच्या इच्छेसह हिंदू आणि मुस्लिम दोघांचा समावेश होता. या गमावलेल्या गौरवाच्या आणि आपुलकी तसेच ओळखीच्या शोधात ख्रिश्चन मिशनरी आणि शुद्धी संगठनाला प्रतिसाद म्हणून तबलिगी जमातीचा उदय झाला. सामाजिक आणि राजकीय नुमन्यांच्या परस्परसंबंधांमुळे तबलिगी जमातीची निर्मिती झाली. ज्यांचा मूळ हेतू विचलित झालेल्या मुस्लिमांना एकत्र करणे आणि एका धार्मिक समूहात विकसित करणे हा होता. जरी हा एका गहन राजकीय संदर्भाचा उदय असला तरी तबलिगिंनी विशेषतः भारतात अराजकीय वर्तणूक राखली.
सर्व खेळाडूंसाठी संदेश – काही ठिकाणी वेड्या मनांसाठी संदेश असतात. तबलिगी जमातीने राजकीय मुद्दे रद्द करून वैयक्तिक सामाजिक सुधारणेला भर दिला आहे. हे स्पष्टपणे सांगते की तब्लिगिंनी राज्य सरकारच्या अधिकारानंतर प्रत्यक्ष इच्छा व्यक्त केली नाही. यामध्ये इस्लामिक समाजाच्या तळागाळातील दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे आणि त्यांच्या या मुद्द्यावरच्या, ज्यामध्ये राजकारणाचा समावेश आहे त्याच्या संपूर्ण विच्छेदनाला दोष दिला आहे. जसे की तबलिगीनी राजकारणातून माघार घेतली आहे, ते ‘सुरक्षा धोका’ म्हणून उदयास येणार नाहीत. राजकारणापासून अंतर राखले असल्याचे सांगूनहीही चळवळ अस्तित्वात आहे, कार्य करत आहे, राजकीय सीमांमधून आणि राजकीय समूहांमधून प्रवास करते आहे. अराजकीय असण्याच्या सातत्यावर टिकून राहण्याच्या चिकाटीवरही गंभीर राजकीय परिणाम होत असतो. राजकीय दुर्लक्ष किंवा औदासिन्याची किंमत फार जास्त असते. आज आपण पाहतो आहोत, तबलिगी साथीचा आजार पसरवण्यामध्ये आणि मोठ्या समूहाचे राक्षसीकरण करण्यामध्ये गुंतलेले आहेत. सध्याच्या वादविवादात हा विविध समूहातल्या लोकांसाठी नकळत एक धडा आहे, SARS CoV2 विषाणू एक सामायिक शत्रू आहे आणि या क्षणाला समस्या ओळखणे महत्वाचे आहे. प्राधान्यांचा विचार करताना कोणतीही कृती ही निष्क्रियतेपेक्षा अतिरेकी धोक्यासारखी आपल्यावरच उलटू शकते. या विषाणूला पाहता सर्व सुरळीत होणे कठीणच आहे. तबलिगी जमातीच्या भोवतीचे द्वेषाचे राजकारण ही जागतिक आणि राष्ट्रीय चिंतेची परिस्थिती वेगळेपणासह वाढवत आहे. ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो आहे. गोवंशाच्या मुद्द्याप्रमाणेच नोवल कोरोना विषाणूचा मुद्दासुद्धा हिंदू मुस्लिमांमधील जातीय तेढ अधिक तीव्र करण्यासाठीचा एक योगायोग आहे का? स्पष्ट भाषेत हा योगायोग नाही. हा एका व्यंगचित्राचा, रचनेचा आणि देशाचा एक भाग धोक्यात आणण्याचा एक नमुना आहे.
अंबरीन आगा या ओ.पी.जिंदाल ग्लोबल विद्यापीठाच्या जिंदाल स्कुल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्समध्ये सहाय्यक प्राध्यापिका आहेत. ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.