शक्ती कपूरचा मुलगा सिध्दांत कपूर पोलिसांच्या ताब्यात; ड्रग घेतल्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला बंगळुरू पोलिसांनी ड्रग प्रकरणात अटक केली आहे. सिध्दांत वर ड्रग्ज घेतल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बंगळुरूमध्ये अटक केली. सिद्धांत कपूरसह सहा जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,रविवारी रात्री एम. जी. रोडवरील एका हॉटेलमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या हॉटेलवर छापा टाकला. सिध्दांत ने ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, पोलिसांनी ड्रग सेवनाची तपासणी केली असता सिद्धांत कपूरसह सहा जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले आहे.

 

कोण आहे सिध्दांत कपूर-

सिध्दांत कपूर हा दिग्गज अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आहे. सिद्धांतने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही केल्या आहेत. स्टार-किड असूनही, सिद्धांत कपूरने डिस्क जॉकी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केले. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धांतने ‘भूल भुल्लैया’, ‘भाग-भाग’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.