शेतकरी आंदोलनाला प्रोपोगेंडा म्हणणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींना तापसी पन्नूचा करारा जवाब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ आंदोलनाचे पडसाद आंतराष्ट्रीय स्तरावर पडत आहेत.

सुप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना  आणि ग्रेटा थनबर्ग, आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर भारतातील कला आणि क्रीडा विश्व अचानक खडबडून जाग झालं. आणि या सर्वानी सरकारच्या बाजूने उभे राहत शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना खोटा प्रचार करत असल्याचे सांगत आगपाखड केली.

क्रिकेट विश्वातून सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, तर बॉलीवूडमधून लता मंगेशकर, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनी ट्विट करुन हा  भारतविरोधी अपप्रचार असल्याची भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेल्या ट्विटर वॉरवर आता इतरही सेलिब्रिटी मैदानात उतरुन आपलं मत मांडत आहेत. मात्र, बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने या सेलिब्रिटींच्या मताचा चांगलाच समाचार घेतला. ”जर एखादे ट्विट आपल्या ऐक्याला त्रास देत असेल, एखादा विनोद तुमचा विश्वास गमावत असेल किंवा एखादा शो तुमच्या धार्मिक श्रद्धेला तडा देईल. तर, तुम्हालाच तुम्हीच मुल्यप्रणाली आणखी ताकतवान बनण्यासाठी कार्य केले पाहिजे. मग, इतरांसाठी ते ‘Propagand Teacher’ बनणार नाही.”

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल केला त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा झाली. रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. मीना हॅरिसनं लिहिलं की, आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ट्विटरवरून गेल्या २४ तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’. 

 

Leave a Comment