गर्भवती हत्तीणीच्या हत्येबद्दल अक्षय कुमारचा संताप, म्हणाला..

0
50
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये गर्भवती हत्तीच्या हत्येमुळे लोकं दुखी झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपला संताप व्यक्त केला आणि हत्तीणीला ओलसर डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनीही याबाबत सोशल मीडियावर आपले दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमारनेहि सोशल मीडियावर यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फेसबुकवर पोस्ट करत अक्षय कुमारने लिहिले- “कदाचित प्राणी माणसांपेक्षा कमी जंगली असतात आणि मानवाकडे माणुसकी कमी असते.त्या हत्तीबाबत जे झाले ते अतिशय हृदयविदारक, अमानुष आणि न स्वीकारले जाणारे आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जावी. #AllLivesMatter ”

केरळमध्ये गर्भवती असणारी एक वन्य हत्तीण अन्नाच्या शोधात रस्त्यावर आली. तेव्हा तेथील स्थानिकांनी तिला फटाक्यांनी भरलेली अननस दिली. ते खाताच तिच्या तोंडात इतका शक्तिशाली फटाक्यांचा स्फोट झाला की तिची जीभ आणि तोंड गंभीररित्या जखमी झाले. या हत्तीणीने वेदना आणि भुकेने सर्व गाव फिरली मात्र दुखापतीमुळे ती काही खाऊ शकली नाही.

यानंतर, वेदनांनी अस्वस्थ होऊन ती हत्तीण नदीत गेली. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. असह्य वेदनांपासून स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करीत ती नदीतच उभी राहिली. वनाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिने माश्या आणि इतर कीटकांपासून वाचण्यासाठी असे केले असावे.

तिला नदीतून बाहेर काढून उपचार करण्याचा विचार वनाधिकाऱ्यांनी केला. सुरेंद्रन आणि नीलकंठण या दोन हत्तींच्या मदतीने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला पण ती बाहेर आलीच नाही. अखेर २७ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता पाण्यातच उभी राहून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here