मुंबई उच्च न्यायालयाचा Rapido ला दणका !!! महाराष्ट्रातील सर्व्हिस तात्काळ बंद करण्याचे दिले आदेश

Rapido
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाईक टॅक्सी आणि ऑटो सर्व्हिस देणाऱ्या Rapido ला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. आज (शुक्रवारी) मुंबई उच्च न्यायालयाकडून Rapido चे सर्व कामकाज तात्काळरित्या थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. महाराष्ट्रात आपली सर्व्हिस सुरु करण्यासाठी रॅपिडोने राज्य सरकारकडून कोणताही परवाना घेतलेला नाही. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारीच कंपनीची सेवा दुपारी 1 वाजेपर्यंत बंद करण्याचे आणि 1.15 वाजेपर्यंत कोर्टाला यासंदर्भात दुजोरा देण्याचे कठोर आदेश दिले होते.

Bombay HC directs Rapido to stop operations in Maharashtra immediately.  Details here | Mint

आता हे अ‍ॅप एक वाजेपर्यंत सर्व सेवांसाठी बंद करण्यात यावे आणि दुपारी 1.15 वाजेपर्यंत न्यायालयाला याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे न्यायालयाने सांगितले. हे ध्यानात घ्या कि, कंपनीकडे महाराष्ट्रात Rapido ची डिलिव्हरी आणि बाईक टॅक्सी सर्व्हिसशी संबंधित कोणत्याही प्रकारचा परवाना नाही.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

परवान्यासाठी केला आहे अर्ज

Rapido च्या वतीने न्यायालयात हजर झालेल्या वकिलांनी यासंदर्भात युक्तिवाद करताना सांगितले की, या स्टार्टअपने परवान्यासाठी अर्ज केला असून, राज्य सरकारकडून त्यासाठी अद्याप परवानगी मिळणे बाकी आहे. अशा परिस्थितीत कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सर्व्हिसेस बंद होता कामा नये. मात्र, न्यायमूर्ती जीएस पटेल आणि न्यायमूर्ती एसजी डिगे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, परवाना प्रक्रिया अजूनही अर्जाच्या टप्प्यात असताना सर्व्हिस देणे बेकायदेशीर असल्याचे सिद्ध होते. यासोबतच बाईक टॅक्सी चालवण्याबाबत कोणतीही पॉलिसी तयार न केल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारकडूनही उत्तर मागवले आहे.

Rapido bike-taxi service suspends operations in entire Maharashtra with  immediate effect - India Today

Rapido सर्व्हिस किती काळ बंद राहणार ???

न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीची पुढील तारीख 20 जानेवारी निश्चित केली आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील सुनावणीनंतरच रॅपिडोच्या ऑपरेशनबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रॅपिडोसाठी हा दुसरा झटका आहे. कारण यापूर्वी कर्नाटकातही रॅपिडोला अडचणींचा सामना करावा लागला होता. रॅपिडोसोबतच ओला आणि उबेर सारख्या अ‍ॅप-बेस्ड ऑटो एग्रीगेटर्सची कर्नाटक परिवहन विभागासोबत कमिशन आणि परवाना शुल्कावरून वाद सुरू आहेत.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rapido.bike/

हे पण वाचा :
आता SBI सुद्धा जारी करणार ई-बँक गॅरेंटी, जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती
ESAF Small Finance Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, असे असतील नवीन व्याजदर
‘या’ Penny Stock ने एका महिन्यात तिप्पट नफा देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Bank Strike : महिनाअखेरीस सलग चार दिवस बँका राहणार बंद, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपावर जाण्याची घोषणा
84 वर्ष जुन्या Jammu and Kashmir Bank ने देखील FD वरील व्याज दरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर