मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. कोर्टानं त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तसेच सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे.
अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले.
या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. कोर्टाच्या या स्पष्ट निर्देशामुळे आता अर्णव यांच्या वकिलांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर त्यावर सत्र न्यायालय निर्णय देईल. तोपर्यंत अर्णव यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Bombay HC rejects Arnab Goswami’s interim bail plea)
पंकजा मुंडेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर; सेना खासदार हेमंत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/cYGG5sFZtY@CMOMaharashtra @ShivSena @BJP4Maharashtra @Pankajamunde #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 9, 2020
दिवाळीला स्वस्तात सोनं खरेदीची सुवर्ण संधी! शेवटचे ५ दिवसचं बाकी..
वाचा सविस्तर-👉 https://t.co/YOkKiP4gbR#goldprice #Gold #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 9, 2020
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in