Sunday, February 5, 2023

फडणवीसांचे हायकोर्टाला साकडं; अर्णव गोस्वामीला कोठडीत होत असलेल्या त्रासाची दखल घ्यावी

- Advertisement -

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या बचावासाठी आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करुन अर्णव गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीची अर्ज फेटाळला. ना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

कोर्टाच्या या स्पष्ट निर्देशामुळे आता अर्णव यांच्या वकिलांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर त्यावर सत्र न्यायालय निर्णय देईल. तोपर्यंत अर्णव यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Bombay HC rejects Arnab Goswami’s interim bail plea)

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in