विवाहीत आत्याला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, त्यानंतर घडले असे काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील आझमगढमधील पवई गावात एका 14 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आपल्या मुलाच्या खुनामागे कोणाचा हात आहे हे जेव्हा पालकांना समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार हि या मुलाची सखी आत्या आहे. मृत मुलाचे नाव सत्यम असे आहे.

या प्रकरणातील आरोपी आत्या हि त्याच गावात आपल्या पतीसोबत राहते. मात्र या आत्याचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. अनेकदा ते गावाबाहेर भेटायचे. तिथे ते शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. सत्यम हा दररोज गावाजवळील रानात त्याच्या गाई चरायला नेत असायचा. अनेकदा त्याच्यासोबत त्याचे भाऊ शिवम व सौरभदेखील असायचे. एकदा असाच गायी चारत असताना सत्यमने त्याची आत्या व तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिले. ते बघून तो हादरलाच. मात्र त्याने ती गोष्ट कुणालाच सांगितली नव्हती.

यानंतर सत्यमची आत्या व तिच्या प्रियकराला सत्यम त्यांच्या संबंधाविषयी सगळ्यांना सांगेल याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी सत्यमचा काटा काढायचे ठरवले. सत्यम नेहमीप्रमाणे त्याच्या भावंडासोबत गाई चारायला गेला होता. त्यावेळी आत्याचा प्रियकर प्रियांशूने सत्यमचे अपहरण केले व त्यानंतर तो त्याला एका अर्धवट बांधलेल्या घरात घेऊन गेला. त्या ठिकाणी प्रियांशूने आपल्या मित्रांच्या मदतीने सत्यमची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सत्यमची आत्या, तिचा प्रियकर प्रियांशु व त्याच्या एका मित्राला अटक केली आहे.

Leave a Comment