प्रेयसीवर संशय असल्याने प्रियकराने केली हत्या..दुचाकीवरून नेला मृतदेह; पहा CCTV व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : प्रेयसीचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून तिचा खून करून औरंगाबाद येथून पसार होत लोणावळ्यात आलेल्या खुनी प्रियकराला लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. भोला कुमार असे अटक केलेल्या परप्रांतीय खुनी प्रियकराचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज मुळे ही घटना समोर आली.

भोला कुमार हा तरुणीच्या वडिलांच्या सोबत प्लंबिंगचे काम करत होता. 8 नोव्हेंबर रोजी तरुणी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथील राजनगर विभागात युवती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचे समजले. त्यांनी तेथे जाऊन बघितले असता ती आपलीच मुलगी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

दरम्यान, त्यांनी भोलाकुमार याला फोन केला असता त्याचा फोन बंद लागत असल्याने त्यांना त्याचा संशय आला व त्यांनी औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीला लोणावळ्यात पकडले.

इतर महत्वाच्या बातम्या –

Gold Price : सोन्याचे भाव वाढले तर चांदी स्वस्त झाली, आजचे नवीन दर तपासा

फक्त 10 हजार रुपयांची बचत करून मिळेल 16 लाखांचा फायदा, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ खास योजनेबद्दल जाणून घ्या

तुमच्या आधारचा कुठे गैरवापर होत आहे का? Aadhar Authentication History कशी तपासावी जाणून घ्या

खुशखबर ! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, त्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

Aadhaar Verification : आता आधार व्हेरिफिकेशन ऑफलाइनही करता येणार, यासाठीची पद्धत काय आहे जाणून घ्या