आपला हर्षवर्धन पाटील व्हायला नको म्हणून भालकेंचा गपगुमान राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या बातम्या येत असताना त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भालके सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. तर आघाडीत पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे उचित समजले आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपलाच धक्का बसला आहे.

भारत भालके यांनी २००९ साली राष्ट्रवादीचे उमेदवार तत्कालीन कॅबनेट मंत्री viविजयसिंह मोहिते पाटील यांचा अपक्ष निवडणूक लढवत पराभव केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि २०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढल्यावर त्यांनी कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन मोदी लाटेत विजय संपादित केला. आता काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली असताना पंढरपूर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे राजकीय गोची झालेल्या भारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यातच आपला विजय मानले.

दरम्यान भाजप या मतदारसंघातून ८० वर्षीय सुधाकर परिचारक यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. सुधाकर परिचारक भाजपकडून या ठिकाणी लढले तर भारत भालकेंसाठी हि निवडणूक सोपी नसणार आहे असे येथील जाणकार सांगतात. तर सुधाकर परिचारक भाजपकडून उतरल्यास भालके निवडणुकीत त्यांच्यावर टीका नकरता स्वतःच्या आजारपणाचे कारण पुढं करून मतदारांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील असे देखील बोलले जाते आहे.