हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं अमेरिकेतील परिस्थिती किती भयावह आहे, याचा अंदाज तेथील प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांच्या वक्तव्यावरून लावता येऊ शकतो. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ ते २ लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती डॉ. फाऊची यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसात अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. याचे परिणाम खूप भयावह होऊ शकतात असंही डॉ. फाऊची यांनी म्हटलं आहे.
सद्यस्थितीला अमेरिकेत सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण आहेत. अमेरिकेतील करोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ३१ हजारांवर पोहोचला आहे. तर जवळपास २३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आहेत. जवळपास ५९ हजार ५०० रुग्ण एकट्या न्यूयॉर्क शहरात आहेत. तर ९५० हून अधिक जणांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील झपाट्याने वाढणारी कोरोना बाधितांची संख्या यावरुन डॉ. फाऊची यांनी यांनी हा अंदाज लावला असावा.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.