एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची लेट पण थेट प्रतिक्रिया (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खडसे यांच्या पक्षांतरानंतर राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. अनेक राजकिय नेत्यांनी खडसेंच्या पक्षांतरावर चांगली वाईट टिपण्णी केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर आपले मत व्यक्त केले आहे. आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळुन भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करु अशी लेट पण थेट प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला आहे. त्यांना चांगली वागणुक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे सांगुन पृथ्वीराज चव्हाण यांनी खडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळुन भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करु, असा विश्वासही कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

तसेच बिहारमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी असून नितीशकुमार यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी आहे. भाजपने मित्रपक्ष रामविलास पासवान यांना नितीशकुमार यांना विरोध करायला सांगितले आहे. त्यामुळे भाजपची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे वातारवण तयार केले आहे. लालुप्रसाद यादव यांना बरेच दिवस तुरुगांत ठेवल्याने त्यांच्याबद्दल सहानुभुती आहे. नव्या पिढीचे युवक बाहेर निघाले असल्याने बिहारमध्ये महागठबंधन विजयी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment