कोल्हापूर प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष , माजी खासदार राजू शेट्टी विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना आघाडीच्या घटक पक्षांनी विनंती देखील केली आहे अशी माहिती समोर येत आहे.
काजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का
चंद्रकांत पाटील हे जर ग्रामीण मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढणार असतील तर त्यांना आपण विरोधात उभा राहून आव्हान देणार असे राजू शेट्टी यांनी याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः निवडणूक लढण्याचे संकेत आधीच दिले आहेत. म्हणून राजू शेट्टी हे विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील असे बोलले जाते आहे.
युती तुटण्याचे संकेत : संजय राऊत म्हणतात
दरम्यान १२५ -१२५ जागांवर लढून ३८ जागा आघाडीच्या घटक पक्षांना सोडण्याचा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीने घेतला आहे. मात्र ३८ हा आकडा घटक पक्षांना मान्य नसून त्यांना अधिकच्या जागा पाहिजे आहेत. किमान ५० ते ५५ जागा या घटक पक्षांना हव्या आहेत. त्यामुळे सर्व घटक पक्षांनी या जागांच्या वाटाघाटीसाठी राजू शेट्टी यांनाच पुढे केले आहे.
ब्रेकिंग| सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!