हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी एक जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राजघाटकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान या माथेफिरूने आधी हवेत बंदूक भिकावली आणि नंतर थेट जमावाच्या दिशेने गोळी झाडली अशी माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी होली फॅमिली रुग्णालयात नेलं असून गोळीबार करणाऱ्या संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
#WATCH A man brandishes gun in Jamia area of Delhi, culprit has been detained by police. More details awaited. pic.twitter.com/rAeLl6iLd4
— ANI (@ANI) January 30, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
नारीशक्तीचा बुलंद आवाज हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अखेर कोरोनाव्हायरसचा भारतात प्रवेश; वुहानहुन परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोना विषाणूची लागण
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे एकाच विचारधारेचे – राहुल गांधी