टीम हॅलो महाराष्ट्र । निवृत्तीवेतनातून मिळणार्या मासिक उत्पन्नावर सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात निवृत्तीवेतन धारकांना मोठा दिलासा देऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविला आहे. या प्रस्तावात सध्याची सूट मर्यादा 15,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी केली आहे.
खरं तर, मासिक पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न इतर उत्पन्नाच्या स्त्रोताखाली येते आणि करपात्र आहे. यावर, 50 हजार रुपयांच्या मानक कपातीचा लाभही उपलब्ध नाही. कामगार मंत्रालयाच्या मते ही तरतूद भेदभाव करणारी आहे. म्हणजेच पेन्शनधारकांना लाभ दिल्यास ते अधिक चांगले होईल. यामुळे अर्थ मंत्रालयावर फारसा बोजा पडणार नाही. सरकार या प्रस्तावावर विचार करीत आहे आणि कदाचित या वेळी अर्थसंकल्पात ही सवलत जाहीर केली जाईल.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
अर्थसंकल्प दरवर्षी का सादर करतात?
#Budget2020: म्युच्युअल फंडमधून पैसे कमविणा्यांना ‘या’ करातून मिळू शकते सवलत
अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये नक्की कशाचा समावेश होतो?