मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मत देऊन दिला आमदारकीचा राजीनामा

अहमदाबाद |मोदी सरकारच्या पुनःस्थापने पासून देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेसचे आमदार आणि ठाकूर समुदायाचे नेते अल्पेश ठाकूर यांनी भाजपला आपले मत टाकून क्रॉस वोटींगचा प्रकार घडवून आणला. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला.

अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांवर आज गुजरातमध्ये मतदान पार पडले. १९८५च्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार या मतदानाचा असा नियम असतो की विधानसभेचा जो व्यक्ती सदस्य असेल त्याने आपले मत आपल्या पक्षाच्या प्रतोकाला दाखवूनच मतदान करायचे असते. अल्पेश ठाकूर यांनी आपले मतदान भाजपच्या उमेदवाराला नोंदवले आणि त्यानंतर काँग्रेसच्या प्रतोकाला दाखवूनच मतपत्रिका मतपेटीत टाकली. त्यानंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्या दालनात जाऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

दरम्यान अल्पेश ठाकूर यांच्या समेवत धवलसिंह झाला यांनी देखील भाजपला मतदान केली आणि त्यांनी देखील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. राजीनामा सादर केल्या नंतर अल्पेश ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या सोबत काँग्रेस नेतृत्वाने द्रोहकेला आहे. वेळोवेळी आपण येथील नेत्यांनी केलेल्या आपमानाबद्दल पक्ष नेतृत्वाला सांगितले मात्र त्यांनी आपले काहीच ऐकले नाही. हि काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची हार आहे असे अल्पेश ठाकूर म्हणाले आहेत. याच प्रमाणे त्यांनी भाजप प्रवेशावर भाष्य करणे मात्र टाळले आहे.