आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

3
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास आता खचला आहे. त्यामुळे ते राजीनामे देऊन हातपाय गाळत आहेत असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी आघाडीच्या नेतृत्वाला काढला आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार या आठवड्यात राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे.

अनिश्चिततेमध्ये जीवनाचा मजा खूप वेगळा असतो असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी कोणते आमदार भाजप मध्ये दाखल होणार आहेत यावर भाष्य करणे टाळले. मी जर तुम्हाला या संदर्भात सर्वकाही सांगितले तर मग मजाच काय उरणार असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे.

विधानसभेच्या कार्यकाळ समाप्त होण्यासाठी ६ महिन्या पेक्षा कमी कालावधी राहिला असल्यास विधानसभेची पोटनिवडणूक लागत नाही. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीतील बरेच आमदार भाजपमध्ये दाखल होणार आहे. त्यांनी आता राजीनामा दिल्यास त्यांचे पद रिक्त राहील त्या जागी निवडणूक लागणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते आज सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here