भाजपचा सर्व्हे तयार ; महायुतीला मिळणार एवढ्या जागा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  भाजप आणि शिवसेना आपले नव्याने अस्तित्व निर्माण करण्यासाठी राज्यात विधानसभाचा लढा देत आहेत. त्यांना परस्परांचे आव्हान आहे. कारण दोघांच्या ताब्यात राज्याची सत्ता आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांचा अश्वमेध रोखण्यासाठी उसने अवसान आणत आहे. अशा सर्व राजकीय परिस्थितीत भाजपने आपला महायुतीच्या विधानसभा लढतीचा सर्व्हे तयार केला आहे.

राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

भाजपच्या एका मंत्र्याने नाव उघड नकरण्याच्या सबबीवर भाजपने केलेल्या सर्व्हेचा आकडा सांगितला आहे. भाजप शिवसेना आणि इतर मित्रपक्ष मिळून विधानसभा निवडणूक लढवल्यास महायुतीला २२९ जागा मिळतील. असा अंदाज भाजपच्या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. हा आकडा कित्पत खरा होणार हे विधानसभा निवडणुकीनंतर लागणाऱ्या निकालातूनच स्पष्ट होईल. मात्र तूर्तास भाजप हा आकडा विरोधकांचे मनोबल खच्ची करण्यासाठी पुढे करते आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

याआधी भाजपने स्वबळावर लढल्यास काय होईल याचा देखील सर्व्हे जुलै महिन्यात केला होता. या सर्व्हेत भाजपला स्वबळावर १६० जागा मिळतील तर शिवसेना देखील ९० जागा मिळवेल. तर विरोधी पक्ष असणऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अवघ्या ५८ जागांवर समाधान मानावे लागेल असे या सर्व्हेत म्हणण्यात आले होते.