पुणे प्रतिनिधी | अजित पवार यांचा विधानसभा निवडणुकीला बारामती मतदारसंघातून अजित पवार यांचा पराभव करणे हा केवळ आशावाद असू शकतो. अजित पवारांना पराभूत करणे हे माझे टार्गेट असले तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर बारामतीचे २०२४ च्या लोकसभेचे लक्ष आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे.
चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे त्यांना पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची खासकरून बारामती मतदारसंघाची व्हिव रचना काय असणार यावर प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार यांना पराभूत करणे हा केवळ आशावाद असू शकतो. अजित पवारांना पराभूत करणे हे माझे टार्गेट असले तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर बारामतीचे २०२४ च्या लोकसभेचे लक्ष आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे.
अजित पवार यांचे बारामती मतदारसंघात व्यापक काम आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणे तसे शक्य नाही. तरी देखील त्यांना पराभूत करणे आमचे उद्दिष्ट राहणारच आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. दरम्यान शरद पवारांना आम्ही लोकसभा निवडणुकीत पिंगा घालायला लावला आहे. आता राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीला उद्धवस्त करणार आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे.