अजित पवारांच्या त्या टीकेवर गिरीश महाजन म्हणतात

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना नाच्या म्हणून संबोधल्या नंतर गिरीश महाजन यांनी देखील अजित पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजित पवार यांना नेमके काय झाले आहे हे मला समजत नाही. मी मागील तीन दिवस नाशिकचा पालकमंत्री या नात्याने तेथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होते आणि मला पुराकडे बघा असे अजित पवार म्हणतात ? हे आश्चर्याचे आहे असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. ते एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत होते.

अजित पवारांची जीभ घसरली ; गिरीश महाजनांना म्हणाले ‘नाच्या’

तिकडं नाशिकला पूर आला आहे. तर मंत्री मोहोदय नाचकामात दंग आहेत. नाच्याचे काम आपले नाही नाही मंत्री मोहोदय असे अजित पवार म्हणाले होते. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी येथून आज राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेस प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाच्या शुभारांभा वेळी अजित पवार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

३७० कलम रद्द झाल्याचा भारतीयांप्रमाणे मला देखील आनंद होता. म्हणून मी देखील लाचून आनंद व्यक्त केला यात बिघडल काय? याच अजित पवार यांना दु:ख का व्हाव. आम्ही अजित पवार यांच्यासारखे धरणात विचित्र प्रकार करण्याचे वक्तव्य जबाबदारीच्या पदावर असताना तर दिले नाही ना? असे सवाल उपस्थित करून गिरीश महाजन यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here