मुंबई प्रतिनिधी | हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रह धरलेला असतानाच राष्ट्रवादीने इंदापूरचे जागा जिंकल्याने माघारी देण्यास नकार दिला आहे. अशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी इंदापूरच्या जागेचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला इंदापूरची जागा फक्त सोडू नये तर जागा सोडून सुप्रिया सुळेंना जशी आम्ही मदत केली तशी मदत आम्हाला करावी असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
म्हणून सुषमा स्वराज यांचे निधन होताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी जनसंपर्क वाढवत २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरु केली. मात्र राष्ट्रवादीने जिंकलेली जागा काँग्रेसला सोडायला नकार दिला आहे. तर हर्षवर्धन पाटील यांनी हि जागा काँग्रेसचीच आहे आणि ती काँग्रेसलाच दिली जावी असा दावा केला आहे. त्यामुळे आता इंदापूरच्या जागेवर जागा वाटपात काय तोडगा निघतोय हे बघण्यासारखे राहणार आहे.
तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते आहे ते शरद पवारांमुळे आहे : अमोल कोल्हे
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीने हि जागा सोडल्यास दत्ताञय भरणे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा पेचात राष्ट्रवादीला दत्तात्रय भरणे यांच्यासारखा नेता गमवावा असे वाटत नाही. त्यामुळे या जागेचा काय तोडगा निघणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन
३७० कलमासंदर्भातील विधेयक लोकसभेत देखील संमत