मुंबई प्रतिनिधी | कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्यांच्या आसनाजवळ नेहून स्थानापन्न केले. त्यानंतर सभागृहात विरोधी पक्षनेते यांच्या अभिनंदनाची भाषणे झाली. या भाषणा नंतर स्वत: विजय वडेट्टीवार आभार मांडण्यासाठी उभा राहिले तेव्हा त्यांनी एकनाथ खडसे यांनी मदत मागितली. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवून या संदर्भात अनुमोदन दिले.
एकनाथ खडसे विरोधी पक्ष नेते असताना त्यांचे भाषण ज्यावेळी सुरु होत होते तेव्हा आम्ही धावत पळत सभागृहात येत असू.खडसेचे भाषण म्हणजे विरोधी पक्षाच्या भूमिकेचे विस्तृत विमोचन असे असे उद्गार विजय वडेट्टीवार यांनी काढले. तसेच आपल्याला विरोधी पक्ष नेता म्ह्णून काम करण्यासाठी खडसेंची मदत होईल असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना सरकारची पळता भुई थोडी व्हायची. ज्याला महत्त्वाकांक्षा नाहीये तो राजकारणात राहू शकत नाही. सीएम साहेब तुम्हाला दिल्लीत पाहायचंय असही वडेट्टीवारांनी म्हणले आहे.