पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीला दारुण पराभव केला. त्यांच्या या पराभवाच्या रूपाने पवार घरण्याला पहिला पराभव बघायला मिळाला. त्यानंतर आता पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार का? आसा सवाल अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला असता त्या प्रश्नाला उत्तर देणे अजित पवार यांनी रीतसर टाळले आहे.
आमचा पक्ष निवडणूक लढायला बळजबरी करत नाही. विधानसभा लढायची कि नाही हा पार्थचा स्वतःचा प्रश्न आहे. त्यावर तो निर्णय घेईल असे म्हणून अजित पवार यांनी ता प्रश्नाला बगल दिली. पिंपरी चिंचवड येथे दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्याच प्रमाणे जागा वाटपा संदर्भात सकारात्मक बोलणी झाली आहेत. आमच्या आघाडीत काही जागांची आदला बदली होऊ शकते. त्याच प्रमाणे काही जागा आमच्या मित्र पक्षांना देखील सुटू शकतात असे अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान शिवसेनेच्या मोर्च्यावर अजित पवार यांनी देखील तोंड सुख घेतले आहे. विधी मंडळात कसल्याही पध्द्तीचे शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेना मांडत नाही. सभागृहात यांची दातखीळ बसते आणि असे रस्त्यावर उतरून जनतेचा पुळका आल्या सारखे दाखवतात असे अजित पवार म्हणाले आहेत.