मुंबई प्रतिनिधी |काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकाराला. त्यावेळी काँग्रेसचें अनेक नेते उपस्थित होते. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात यांना पदभार दिला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे.
भाजपवर टीका करतच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नेत्यांना देखील कानपिचक्या दिल्या आहेत. पक्षपुढे संकट होते आहे. त्यामुळे तुम्ही आपसातील मतभेद विसरून पक्षाच्या कामाला लागा. काँग्रेस पक्षाला संकटे पचवण्याची सवय आहे. त्यामुळे आता उभा असणारे संकट लोप पावून काँग्रेसची पुन्हा राज्यात सत्ता प्रस्तापित होईल असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
मी जसा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो आहे असे चंद्रकांत पाटील देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या निवडीच्या वेळी ते म्हणाले कि मी कोरे पाकीट आहे जिकडचा पत्ता टाकला जाईल तिकडे मी जाणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. ज्यांना काय व्हायचं ते माहित नाही ते आमचं भविष्य काय सांगणार असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. यावेळी अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेस नेते उपस्थित होते.
इत्तर महत्वाच्या बातम्या –
मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश
आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार
राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया
युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक