महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकली ; अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली ; बचाव कार्य तातडीने सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बदलापूर प्रतिनिधी |  छत्रपती शिवाजी महाराज टार्मिलन्स मुंबईवरून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर जवळील वांगणी गावाजवळ पाण्यात अडकली आहे. अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला असल्याने चालकाला अंदाज येत नसल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे गाडी जागीच उभा करणे चालकाने पसंत केले आहे. या गाडीमध्ये जवळपास २,००० प्रवासी अडकून पडले असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

बागलांचा जीव भांड्यात ; संजय शिंदे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक नाहीत

या ठिकाणी मागील ११ तासापासून प्रवासी अडकून पडले असून त्यांच्या बचाव कार्यसाठी स्वतः मुख्यमंत्री पुढे सरसावले आहेत. तसेच या ठिकाणचे पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री कार्यालयातून लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच एनडीआरएफच्या जवानांना देखील बचाव कार्याला पाचारण करून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

बारामतीकरांचा विश्वासघात ; इंदापूर काँग्रेसला सोडणार नाही ; हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर

बदलापूर परिसरात मागील दोन दिवसापासून संतप्तधार पाऊस पडत आहे. त्यामुळे याभागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली आहे. तसेच अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पाणी भरले आहे. मुंबईच्या लोकलवर याचा मोठा परिणाम झाला आहे. त्याच प्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी मनमाड मार्गे दौंड अशा वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान बचाव कार्य वेगवान पध्द्तीने राबवले जात असून काही प्रवाशांची सुटका करण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश मिळाले आहे.

चौकशीच्या भीतीने लोक पक्ष सोडत आहेत : अजित पवार

संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट यांची नियुक्ती

मुंबई अध्यक्षांसोबत प्रदेशाध्यक्ष देखील राष्ट्रवादी सोडणार

इच्छुकांच्या मुलाखतीला अजित पवार सोलापुरात ; दोन आमदारांनी मारलेल्या दांडीने राष्ट्रवादीत खळबळ

२७ जुलै रोजी छगन भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश!

 

Leave a Comment