नांदेड प्रतिनिधी | कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला लागलेले भाजपचे संक्रमण थांबण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोरठेकर यांनी आज त्यांच्या समर्थकांची बैठक घेवून पुढची राजकीय दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
बापूसाहेब गोरठेकर यांच्या कार्यकर्त्यांकडून भोकर मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा त्यांना आग्रह होतो आहे. गोरठेकर यांनी भोकर मधून निवडणूक लढवल्यास अशोक चव्हाण यांना त्ते खूप मोठे आव्हान असणार आहे. कारण भोकर हा मतदारसंघ अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण सध्या कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत.
दरम्यान बापूसाहेब गोरठेकर राष्ट्रवादी सोडून गेल्यास नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. आधीच राष्ट्रवादीचे अस्तित्व नांदेड जिल्ह्यात कमी असताना आता जिल्हाध्यक्षच भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार
गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत
कराड येथील जुना कृष्णापूल कोसळला
मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर
येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा