माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या हत्या प्रकरणात पत्नीला झाली अटक

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  रोहित तिवारी हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. उतर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचे पुत्र रोहित तिवारी यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या घडवून आणली  असा त्यांच्या पोलीसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी रोहित तिवारी यांच्या पत्नी  पत्नी अपूर्वा शुक्ला यांना अटक केली आहे.  या आधी शनिवारी अपूर्वा शुक्ला तिवारी यांची पोलिसांनी आठ तास चौकशी केली होती.

रोहित तिवारी यांची १६ एप्रिल रोजी हत्या झाली होती. शनिवारी पोलिसांनी रोहित तिवारी  यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांना आणि त्यांची पत्नी अपूर्वा हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल आठ तास चौकशी झाल्या  नंतर पोलीसांना अपूर्वानेच रोहित तिवारी यांची हत्या केली आहे असा संशय बळावला. या संदर्भात आज पोलिसांच्या वतीने पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे.

रोहित तिवारी यांच्या आईने दिलेल्या माहिती नुसार असे  स्पष्ट होते कि, रोहित तिवारी आणि त्यांच्या पत्नी अपूर्वा  यांच्यात टोकाचे वाद  होते. त्यांचे पारिवारिक  जीवन पहिल्या दिवसांपासूनच कलहाने वेढलेले होते. त्यातूनच रोहितची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे.