मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि घटकपक्षांच्या युतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बुधवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळ यांनी केली मोठी घोषणा
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप-शिवसेना २७० जागा तर घटक पक्ष १८ जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजप १६०, शिवसेना ११० आणि घटक पक्ष १८ जागा लढतील, असा फॉर्म्युला प्राथमिक चर्चेत ठरला आहे. कालच्या चर्चेत घटक पक्षांना जास्तीत जास्त १८ जागा देण्यावर दोन्ही पक्षांचं (शिवसेना – भाजप) एकमत झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर २७० जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेशाचा सावध पवित्रा ; राष्ट्रवादीवर घेतले चांगलेच तोंडसुख
शिवसेना भाजप युती होईल का नाही या द्विधा स्थितीचा एकप्रकारे अंत करण्यात सेना भाजपला यश आले असले तरी. कोणत्या जागी कोणी लढायचे याचा निर्णय होणे अद्याप बाकी असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे या जागा वाटपाच्या तिढ्यात भाजप सेनेवर भारी पडण्याची शक्यता असून २०१४ साली जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा भाजप शिवसेनेला सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही असेच चित्र सध्या बघायला मिळत आहे.
Pathri chi jaga shivsenela