सांगली प्रतिनिधी | मागील चार दिवसापासून पाऊस कहर होऊन बरसत होता आणि आम्ही संकटात सापडलो होतो. आता पूर ओसरू लागला आहे तेव्हा तुम्हाला आमची आठवण झाली. चार दिवस आम्हाला कसलीच मदत का पोचली नाही. तुमचं प्रशासन काय करत होते असे सवाल करून गिरीश महाजन आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना पुरग्रस्तांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
शरद पवारांचे जवळचा नातेवाईक आणि राष्ट्रवादी आमदार असणारा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
कोयना धरण परिसरात अतिवृष्टी झाल्याने कटोकट भरलेल्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात पुराची स्थिती निर्माण झाली. या पुरामुळे अनेक लोक बेघर झाले. तर काही लोकांना उपाशी पोटी कुठेतरी जीवन कंठावे लागले. तर प्रशासन या प्रश्नी थंडगार पडल्याचे बघायला मिळाले. तसेच बचाव कार्याला बोटी देखील कमी पडत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्यात बोटींची वाट बघत बसावे लागले. यातून संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी गिरीश महाजन यांच्यावर चांगलाच राग काढला आहे.
तुमचे प्रशासकीय अधिकारी आमच्या पर्यंत का आले नाहीत. तुमची मदत एवढे दिवस आम्हाला का मिळाली नाही. तुम्हाला आम्ही आमचे हाल करून घ्यायला सत्ता दिली होती का असे सवाल विचारून गिरीश महाजन आणि सुभाष देशमुख यांना पुरग्रतांनी भांडावून सोडले.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur
चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले
गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार
शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल
सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा
विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस