राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीही खासदार उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या मागील बऱ्याच दिवसापासून येत होत्या. त्या बातम्या मात्र उदयनराजेंच्या कृतीत उतरून प्रत्यक्षात येताना दिसत नाहीत. कारण उदयनराजे भाजप प्रवेशाचा सावध पवित्रा घेत आहेत. उदयनराजेंच्या सावध पवित्र्यामागे राष्ट्रवादीचे डावपेच आहेत असे बोलले जाते.

तुम्हाला ही भाजपने ईडीची भीती घातली का ? उदयनराजे म्हणतात

उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. ते सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. मात्र हा विक्रम उदयनराजेंच्या करिष्माची आणि राष्ट्रवादीच्या संघटित लढ्याचा परिपाक होता. आता उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांना देखील राष्ट्रवादी निखराची लढत देण्याची शक्यता आहे. संघटन कौशल्याच्या जोरावर राष्ट्रवादी उदयनराजेंना खिंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उदयनराजे पक्षांतराचा सावध पवित्रा घेत आहेत.

राज्य सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणात २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार : अण्णा हजारे

उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाल्यास ते लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला उदयनराजे भाजपचे उमेदवार असणार हे निश्चितच परंतु राष्ट्रवादी देखील त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. कराड दक्षिण लोकसभा मतदारसंघातून १९९९ साली पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीतून पराभव करणारे श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते देखील उदयनराजेंचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडणार हे मात्र नक्की. म्हणून उदयनराजे सावध पवित्रा घेऊन राजकारण करत आहेत.