मेढा प्रतिनीधी । दिवसेंदिवस जावळीत कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रामवाडी पाठोपाठ आता केळघर विभागातील पुनवडी गाव कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहे. गावात जुलै च्या पहिल्या आठवड्यात मुबंईहून भाचीच्या लग्नासाठी मामा मोठ्या उत्साहात गावाकडे आला, मात्र तो येताना सोबत कोरोना कुरवला घेऊन आला आणि अख्ख वऱ्हाड कोरोनाग्रस्त केलं. पुनवडी गावचे सुरक्षा समिती अध्यक्षांच्या घरातीलच हा कार्यक्रम असल्यामुळे कोण बोलणार व कोण क्वाटाईनचे नियम शिकवणार. परंतु संबंधित मामा ला स्वतः च्या मार्ली गावात सुरक्षा समिती ने प्रवेश नाकारल्यामुळे मार्लीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र मामा ने मुक्काम पुनवडीत हलवला व आज पुनवडीत तब्बल ४५ बाधित तर कोरोनाने दोन जणांचा मृत्यू होऊन हे गाव सुरक्षा समिती अध्यक्षांच्या निष्काळजीपणामुळेच कोरोना हॉट स्पॉट बनले आहे.
केळघर भागात तसा यापूर्वीच प्रथम वरोशीत कोरोना दाखल झाला होता. मात्र येथील प्रथम कोरोना बाधित झालेल्या व्यक्तीच्या मृत्यू नंतरही कोरोनाची ही साखळी फारसी वाढली नाही. पुनवडी गावच्या वेशिपर्यंत कोरोना येऊनही गावातील ग्रामस्थ काळजी घेऊन गेली चार महिन्यापासून गुण्या गोविदाने रहात होते. मात्र गावचे सरपंच व सुरक्षा समिती अध्यक्षांच्या घरातच मुलीचा लग्न कार्यक्रम आयोजित होता. या लग्नासाठी मुलीच्या मामाला मुबईहून गावाकडे आणण्यात आले. प्रथम मामा जावळी तालुक्यातीलच मार्ली या स्वतः च्या गावी गेला. मात्र याठिकाणी सतर्क सुरक्षा समितीने क्वारटाईन व्हावे लागेल व सर्व नियम कडक पाळावे लागतील. त्यामुळे मामा ने आल्या पावली आपला मुक्काम बहिणीच्या म्हणजे पुनवडी या लग्नगावी हलवला.
मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी सुरू होती. या तयारीत मामा सर्वत्र फिरत होते. मात्र अचानक मामास त्रास जाणवू लागला व केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकुर्ती व मुबंई ट्रॅव्हल हिस्ट्री माहिती झाल्यामुळे सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. व संबंधित व्यक्तीचे स्वब् रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. व पुनवडी गाव पूर्णपणे हादरून गेले. संबंधित व्यक्तीच्या लग्नकार्यक्रमामुळे अनेकजण संपर्कात आल्यामुळे प्रशासनाची देखील पाचावर धारण झाली. निकट सहवासातील सगळे क्वारटार्ईन करण्यात आले. मात्र दरम्यान हे लग्न पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील एका गावात पार पडले. त्यामुळे नवरदेव कडील वऱ्हाडी मंडळी देखील चांगळेच धास्तावले. यातच नवरी मुलीगी देखील कोरोना बाधित झाली. त्यामुळे जावळी व पाटण दोन्ही तालुक्यातील प्रशासनाची डोकेदुखी वाढली.
पुनवडीत एकापाठोपाठ एक असे आतापर्यंत ४५ बाधित तर दोन जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर अजूनही ही साखळी तुटण्याचे नाव घेत नाहीये. आतापर्यंत या गावातील २६८ जणांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात क्वारटार्ईन करण्यात आले आहे. टप्याटप्याटने यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.
ग्रामसुरक्षा समितीचा निष्काळजीपणा ठरला कोरोना वाढवण्यास कारणीभूत जावळीत लग्न सोहळा म्हणजे वरपिता- वधूपिताच्या दृष्टीने मोठेपणाचा विषय असतो. ऐकीकडे कोरोनाजन्य परिस्थितीमुळे प्रशासन अशा कार्यक्रमांना निरबन्ध घालत आहे. तर मुबंई पुण्याहून प्रवास करून येणाऱ्यांना होम क्वारटाईनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगत आहे, मात्र पुनवडीत लग्नसाठी पाहुणा म्हणून आलेल्या संबंधित व्यक्तीने गावात कोरोनाचा प्रसार केला. तर या प्रसारास स्थानिक ग्राम सुरक्षा समितीचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरला. होमक्वारटार्ईन चे नियमांची संबंधीत व्यक्तीकडून अमंलबजावणी करून घेतली गेली असती तर कोरोनाची ही साखळी वाढली नसती.
पुनवडीतील साखळी रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न कोरोनाने आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे येथील साखळी रोखण्यासाठी तहसिलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, केळघर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना कवारे, आरोग्य कर्मचारी सतीश मर्ढेकर, विशाल रेळेकर, ग्रामसेवक डी एम यादव, आरोग्यसेविका,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका सर्वच जण प्रयत्न करीत आहेत. तर आरोग्य विभागाकडून दररोज येथील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत.
पुनवडीतील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून येथे संचारबंदी कायद्याचे तसेच क्वारटार्ईन नियमांचे उल्लंघन झालेले दिसून येत आहे. त्यामुळे पुनवडी येथे मुंबई वरून प्रवास करून आलेल्या व्यक्तींने होम क्वारं न टाईनचे नियम न पाळल्याने कोरोना चा उद्रेक झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग झाल्याने भारतीय दंड संहीतेच्या कलम क्र.१८८ नुसार पुनवडी येथील सरपंचासह चार जणांवर प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करणार असल्याचे जावळीचे तहसिलदार शरद पाटील यांनी सांगितले.
हे पण वाचा –
लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत
धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग
लाॅकडाउनमध्ये पत्नीचा १० हजारात केला २ तासांसाठी सौदा! पुढे झालं असं काही
लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार
उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!