हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभर करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना याचा फटका ब्रिटनच्या राजघराणाऱ्याला सुद्धा बसला आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्यात करोनाची सौम्य लक्षण आढळून आली आहेत. प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळं त्यांनी आता स्वतःला कोरंटाईन करून घेतलं आहे. यासोबतच प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी कॅमीला पार्कर यांची सुद्धा कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दरम्यान, कॅमीला यांची टेस्ट निगेटिव्ह आली असून प्रिन्स चार्ल्सबरोबर त्याही सेल्फ कोरंटाईनमध्ये गेल्या आहेत. ब्रिटन राजघराण्याविषयी अधिकृत माहिती देणारे क्ल्यारेन्स हाऊस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण झाल्याची बातमी प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. ट्विटरवर तर #Prince Charles हा ट्रेंडही झाला आहे. यामध्ये अवघ्या काही वेळातच ७० हजाराहून अधिक ट्विट पडले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी प्रिन्स चार्ल्स यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना केली आहे. तर अनेकांनी डायना यांच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल असं म्हणत या बातमीची खिल्लीही उडवली आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या