ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पब जूनपासून उघडणार, दारू पिण्याचा कोटा मात्र ठरविला जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पब्स आणि हॉटेल्स चेन चालवणाऱ्या कंपनीने जूनपासून आपले पब्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.वेदरस्पून्स नावाच्या या कंपनीची ब्रिटनमधील प्रसिद्ध भागात उत्तम पब आणि हॉटेल्स आहेत.२० मार्च रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर कंपनीला त्यांचे पब्स आणि हॉटेल्स बंद करावे लागले.त्यानंतर चार दिवसांनी सरकारनेही कडकपणे लॉकडाउन लादले.

वेदरस्पून्स ची संपूर्ण यूकेमध्ये सुमारे ८७९ पब आहेत.ही कंपनी यूकेमध्ये पब्सची सर्वात मोठी साखळी चालवते.तथापि,सरकार लॉकडाउनला परवानगी कशी देते यावर पब्स आणि हॉटेल्स उघडणे अवलंबून आहे.

ब्रिटनचे सरकार निर्बंध कमी करण्याच्या विचारात आहेत. परंतु सोशल डिस्टंसिंगचे नियम मात्र कडक पध्द्तीने लागू होतील असे यूकेच्या खासदारांनी म्हटले आहे.सरकारने असेही म्हटले आहे की मद्यपान करणाऱ्यांसाठी अधिक कठोर नियम बनवले जातील.हे देखील असू शकते की प्रति व्यक्ती तीन पिंट्सचा कोटा निश्चित केला जाईल.

काही तज्ञांचे म्हणणे आहे की पब्सच्या आधी बिअर शॉप उघडतील.पब्स उघडल्यानंतर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन कसे केले जाईल यावर वेदरस्पून योजना आखत आहेत.द सनच्या एका वृत्तानुसार वेदरस्पून्सचे प्रवक्ते एडी गेर्शन यांनी म्हटले आहे की वेदरस्पून्सचे पब्स पुन्हा सुरू करण्याबाबत सरकारशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांनी म्हटले आहे की सरकारने अद्यापही यावर निर्णय घेतलेला नाही असे दिसते आहे.

वेदरस्पून्सच्या प्रवक्त्याच्या वतीने असे म्हटले आहे की इतर कंपन्यांप्रमाणेच आम्हीही पुन्हा पब्स उघडण्याचा विचार करीत आहोत.आम्हाला वाटते की जूनपर्यंत आम्हाला पब्स उघडण्याची मुभा दिली जाईल.तोपर्यंत पब्स बंद होऊन ३ महिने झाले असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

You might also like