नात्यातील तरुणासोबत बहिणीचे प्रेम बघवले नाही, सख्ख्या भावने घेतला बहिणीचा जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिजनौर : वृत्तसंस्था – आपल्या सख्ख्या बहिणीचे नात्यातील एका तरुणासोबत प्रेमप्रकरण असल्याचे समजल्यावर भावाने आपल्या बहिणीची गळा दाबून हत्या केली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी गुपचूप तिचे अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती. पण पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच त्यांनी आरोपी भावाला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

हि घटना उत्तर प्रदेशाच्या बिजनौर शहरातील नगीना परिसरात घडली आहे. या परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. या संबंधाची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला ताकीद दिली होती. तर त्या मुलीचा भाऊ तिच्यावर खूप संतापला होता. या मुलीने आपले प्रेमसंबंध तोडावेत यासाठी भाऊ आणि कुटुंबीयांनी तिच्यावर दबाव आणला होता. पण तिने कोणाचेही ऐकले नाही. यावरून आरोपी भाऊ व मृत बहीण यांच्यात दोन दिवसांपूर्वी मोठा वाद झाला होता.

यादरम्यान भावाने आपल्या बहिणीला बेदम मारहाण देखील केली होती. यानंतर आरोपी भावाने रागाच्या भरात आपल्या बहिणीची गळा चिरून हत्या केली आहे. आपल्या मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी घरच्यांनी मृत मुलीचा मृतदेह लपवून ठेवला होता. तसेच गावात कोणालाही न सांगता अंत्यसंस्काराची तयारीसुद्धा सुरु केली होती. यासाठी त्यांनी कबरस्तानात कबर खोदण्यासही सुरुवात केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी भावाला अटक केली आहे. आपल्या बहिणीचे आपल्या नात्यातील व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध सुरु होते. तिला अनेकवेळा समजावूनदेखील तिने प्रेमसंबंध सुरूच ठेवले. त्यामुळे आपण नाईलाजाने आपल्या बहिणीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.