हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL कडून नुकताच एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला गेला आहे. जो अनेक युझर्सचे लक्ष वेधून घेत आहे. भलेही इतर कंपन्याकडून अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर केले जात असतील. मात्र हा प्लॅन आल्यानंतर या कंपन्या बीएसएनएलशी स्पर्धा करू शकणार नाहीत.
BSNL ने नुकताच युझर्ससाठी सर्वात स्वस्त डेटा प्लॅन जाहीर केला गेला आहे. वास्तविक, BSNL कडून एक असा प्रीपेड प्लॅन लाँच केला गेला आहे ज्यामध्ये युझर्सना 1 रुपयामध्ये 1 GB डेटा मिळेल. या प्लॅनद्वारे बीएसएनएल कडून इतर कंपन्यांना जोरदार स्पर्धा करत आहे. मात्र कंपन्यांनी कितीही प्रीपेड प्लॅन आणले तरी बीएसएनएलला कोणीही टक्कर देऊ शकणार नाही. याशिवाय कंपनीकडून आणखी एक प्लॅन सादर केला गेला आहे. ज्यामध्ये खूपच कमी किंमतीत डेटा दिला जात आहे.
बीएसएनएलचा 347 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा 347 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यामध्ये ग्राहकांना डेली 2 GB हाय-स्पीड डेटा मिळेल. म्हणजे युझरला एकूण 112 जीबी डेटा मिळेल. या 1 जीबी डेटाची किंमत मोजली तर त्यासाठी डेली फक्त 3 रुपये खर्च येतो. याव्यतिरिक्त, या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस आणि गेमिंग सर्व्हिस देखील मिळते.
रिलायन्स जिओ कडून मिळतो 84 GB डेटा
जेव्हा आपण या प्लॅनची इतर कंपन्यांशी तुलना केली तर रिलायन्स जिओ 479 रुपयांमध्ये 56 दिवसांची व्हॅलिडिटी देते. ज्यामध्ये डेली 1.5 जीबी डेटाही मिळतो. अशा प्रकारे, कंपनीकडून एकूण 84 GB डेटा दिला जातो जो BSNL च्या प्लॅनपेक्षा 28 GB नी कमी आहे.
Airtel कडून मिळतो 56 GB डेटा
एअरटेल कडून 359 रुपयांचा प्लॅन ऑफर केला जातो. ज्यामध्ये 2 जीबी डेटा मिळेल. मात्र हा प्लॅन फक्त 28 दिवसांसाठी व्हॅलिड असेल. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 एसएमएस देखील मिळतील. अशा प्रकारे, कंपनी एकूण 56 GB डेटा देते. यावरून बीएसएनएल प्रीपेड प्लॅन हा इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त फायदेशीर असल्याचे दिसून येते
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal2.bsnl.in/myportal/tariffs.do?PREPAID
हे पण वाचा :
आता Cab चालकाने विनाकारण बुकिंग रद्द केल्यास कडक कारवाई केली जाणार !!!
Business Idea : LED बल्ब युनिट बसवून मिळवा लाखोंचा नफा !!!
Railway कडून 212 गाड्या रद्द !!! आपल्या गाडीचे स्टेट्स तपासा
इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस
Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!! नवीन दर पहा