Budget 2022-23: सामान्य अर्थसंकल्प कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी सादर केला जाईल हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे अर्थमंत्री फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी संसदेत सादर करतात. यावेळीही अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता सादर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प असेल.

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 साठी स्टेज तयार झाला आहे, कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 15 डिसेंबरपासून विविध भागधारक, इंडस्ट्री आणि अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू केली आहे. अर्थ मंत्रालयाने 14 डिसेंबर रोजी याबाबत ट्विट केले होते.

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?
अर्थसंकल्प वार्षिक फायनान्शिअल स्टेटमेंट म्हणून ओळखले जाते. घटनेच्या कलम 112 नुसार त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाची माहिती म्हणजे बजेट. अर्थसंकल्प 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षासाठी आहे.

2022-23 चा अर्थसंकल्प कोण सादर करणार?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी 2016 पर्यंत, अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केला जात होता, जो माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बदलला होता.

अर्थसंकल्पाचे घटक कोणते आहेत?
अर्थसंकल्पाचे महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प असे दोन भाग केले आहेत. महसुली अंदाजपत्रकात महसूल प्राप्ती आणि खर्च यांचा समावेश होतो. महसुली पावत्या (Revenue Receipts) दोन प्रकारच्या असतात – टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू. सरकारच्या दैनंदिन कामकाजावर आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांवर होणाऱ्या खर्चाला महसुली खर्च म्हणतात. भांडवली अर्थसंकल्पात (Capital Budget) सरकारच्या भांडवली पावत्या आणि पेमेंट्स समाविष्ट असतात जसे की जनतेकडून घेतलेली कर्जे म्हणजे बॉन्ड, परदेशी सरकारांकडून कर्जे आणि RBI सरकारच्या भांडवली पावतीचा एक मोठा भाग बनवतात. भांडवली खर्च म्हणजे मशीनरी, उपकरणे, इमारत, आरोग्य सुविधा, शिक्षण इत्यादींच्या विकासावरील खर्च.

Leave a Comment