Tuesday, June 6, 2023

नितेश राणेंना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात 27 डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. राणे कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून तशी माहिती देण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण –

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्ला झाला. प्रकरणी पोलिसांना चौघांना अटक केली आहे. संतोष परब यांनी हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. त्यांनतर पोलीस नितेश राणे यांना शोधत आहेत.

नारायण राणेंनाही नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही सिंधुदुर्ग पोलिसांनी बुधवारी नोटीस पाठवली आहे. पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. त्याबाबत नारायण राणे यांना मंगळवारी पत्रकारांनी विचारलं असता, नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असं म्हटलं होतं. त्यावरुनच आता कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवून नारायण राणे यांनी नितेश राणे यांची माहिती द्यावी असं म्हटलं आहे.