हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Budget 2023 : आता लवकरच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. आता या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून नवीन काय घोषणा केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र या अर्थसंकल्प सादर करत असताना असे काही शब्द वापरले जातात जे आपल्या सारख्या सर्वसामान्यांना समजत नाहीत. मात्र जर अर्थसंकल्प (Budget 2023) व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल तर ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ समजून घेउयात…
आर्थिक वर्ष (Financial Year)
आर्थिक वर्ष म्हणजे आर्थिक बाबींच्या हिशेबासाठी आधार असलेले वर्ष. याला अकाउंटिंग आणि अर्थसंकल्पीय हेतूंसाठी सरकार वापरत असलेला कालावधी देखील म्हंटले जाते. Budget 2023
जीडीपी (GDP)
ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (GDP) म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन हे एका वर्षात देशात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य आहे.
प्रत्यक्ष कर (Direct Tax)
देशातील नागरिकांकडून थेट सरकारला दिलाय वाजणाऱ्या कराला प्रत्यक्ष कर म्हंटले जाते. हा आपल्या उत्पन्नावर लावला जातो आणि तो इतर कोणत्याही व्यक्तीकडे ट्रान्सफर केला जाऊ शकत नाही. इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स हे प्रत्यक्ष करांतर्गत येतात. Budget 2023
अप्रत्यक्ष कर (Indirect Tax)
अप्रत्यक्ष कर असे आहेत जे कोणत्याही व्यक्तीकडे ट्रान्सफर केले जाऊ शकतात जसे की, कोणताही सर्व्हिस प्रोव्हायडर, कोणतेही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवरील कर. उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, सेवा शुल्क, जीएसटी हे अप्रत्यक्ष करांतर्गत येतात. Budget 2023
वित्तीय तूट (Fiscal Deficit)
केंद्र सरकारचे उत्पन्न आणि खर्च यामधील तफावतीला वित्तीय तूट असे म्हंटले जाते. वित्तीय तूटीमुळे देशाची सध्याची आर्थिक स्थिती कळून येते. तज्ज्ञांच्या मते भारत येत्या आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट जीडीपीच्या 6.3 टक्के ते 6.5 टक्के ठेवू शकतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiabudget.gov.in/
हे पण वाचा :
Personal Loan वर जास्त व्याज द्यायचे नसेल तर करा ‘हे’ काम !!!
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Indusind Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये