Budget Smartphones : 8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम 5 स्मार्टफोन, तपासा किंमत अन् फीचर्स

Budget Smartphones
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget Smartphones : सध्याच्या काळात बाजारात दररोज अनेक नवनवीन स्मार्टफोन्स दाखल होत असतात. आजकाल बाजारात असे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कमी किमतीत अनेक फीचर्स मिळतात. जर आपल्यालाही स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि आपले बजट कमी असेल आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. कारण आज आपण अशाच 5 सर्वोत्तम स्मार्टफोन्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांची किंमत आठ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…

Moto E22s with 90Hz display, MediaTek Helio G37 launched in India

moto e22s

Moto च्या या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 8MP रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 4GB रॅम देण्यात आली आहे. यासोबतच यामध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. आर्क्टिक ब्लू आणि इको ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या फोनची किंमत फक्त 8,999 रुपये आहे. Budget Smartphones

Vivo Y01 - Price and Specifications - Choose Your Mobile

Vivo Y01

Vivo च्या या स्मार्टफोनमध्ये Helio P35 प्रोसेसर आणि 2 GB RAM + 32 GB स्टोरेज मिळेल. यामध्ये 6.51 चा HD+ डिस्प्ले आणि 5,000 mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये Vivo Y01 मध्ये 5 MP सेल्फी कॅमेरा आणि 8 MP रियर कॅमेरा देखील दिला आहे. एलिगंट ब्लॅक आणि सॅफायर ब्लू अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या फोनची किंमत फक्त 7,999 रुपये (2GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिएंट) आहे. Budget Smartphones

Realme Narzo 50i Real Curved 2.5D Tempered Glass – GlazedInc

realme narzo 50i

realme चा narzo 50i prime हा एक उत्तम पर्याय ठरेल. या फोनमध्ये 6.65-इंचाचा फुल स्क्रीन डिस्प्ले आणि Unisoc ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 5,000 mAh ची दीर्घकाळ टिकणारी बॅटरी मिळेल. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 8 MP रियर AI कॅमेरा आणि HDR मोड असलेला 8 MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. तसेच हा फोनमिंट ग्रीन आणि डार्क ब्लू अशा दोन रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 3GB RAM + 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये तर 4GB रॅम + 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी असेल. Budget Smartphones

Xiaomi Redmi A1+ Price In India & Mobile Specs IN | MobGsm

Xiaomi Redmi A1+

Redmi च्या स्मार्टफोनमध्ये 6.65 इंचाचा पूर्ण डिस्प्ले, MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 8 MP AI कॅमेरा आणि 5 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक लाइट ब्लू आणि लाइट ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 2GB RAM + 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये तर 3GB RAM + 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. Budget Smartphones

BRAND NEW Samsung Galaxy A03 Core Dual SIM 32GB Unlocked 4G 2020 Model UK SELLER | eBay

Samsung Galaxy A03 Core

Samsung च्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा HD + Infinity-V डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर चिपसेट मिळेल. बॅकअपसाठी यामध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच 8MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. हा फोन ब्लू, ब्लॅक, मिंट आणि कॉपर अशा 4 रंगामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 2GB RAM + 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. Budget Smartphones

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/samsung-galaxy-a03-core-green-32-gb/p/itm7f39ac244845c

हे पण वाचा :
Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या
Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ
Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा