मुंबईतल्या मालाडमध्ये इमारत कोसळली, मदत आणि बचावकार्य सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मुंबईतल्या मालाड भागात दोन मजल्यांची इमारत कोसळली आहे. ग्राऊंड प्लस दोन मजले अशी ही इमारत मालाड भागात होती. या ठिकाणी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तूर्तास चार लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र ढिगाऱ्याखाली इतरही लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या घडीला घटनास्थळी ४ अग्निशमन दलाचे बंब, १ रेस्क्यू व्हॅन आणि एक अँब्युलन्स पोहचली आहे. मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

आज दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी ही घटना घडली आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने ट्विट करुन दिली आहे. तळ मजल्यास दोन मजली इमारत कोसळली. या ठिकाणी किमान ५ लोक अडकल्याची भीती आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. मालाडमधल्या मालवणी भागात ही घटना घडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment