मुंबई प्रतिनिधी । बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड कामाला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पालाची चर्चा मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने आधी पासूनच या प्रकल्पाला विरोध केला होता. आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा याच मुद्यावर बोट ठेवत मोदींवर निशाणा साधला.
देशातील हवाई उद्योग अजूनही हवे तसे विकसित झाले नाही. अनेक विमान कंपन्या ह्या नुकसानीत चालत आहे. तर मुंबई- अहमदाबादचा विचार केला तर तीन हजारपेक्षा अधिक भाडे नाहीत. त्यामुळे बुलेट ट्रेनचा १० ते ११ हजार रुपयांचा भाडे भरून कोण प्रवास करणार आहेत. तसेच बुलेट ट्रेनमधून नफा मिळण्यासाठी किती फेऱ्या लावावा लागतील, याचे सुद्धा नियोजन करावे लगणार आहे. मात्र याचा कोणताही विचार मोदींनी केला नसल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.