बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी!! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ग्रामीण भागासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. खेड्यापाड्यातील लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीत सर्वोच्य न्यायालयाने परवानगी दिली आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. बैलगाडा शर्यती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज कोर्टाने निकाल देत या शर्यतीला परवानगी दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयाने बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा आहे. सविस्तर बातमी अपडेट होत आहे… बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा आहे. अशा खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असल्याचा दावा करत कोर्टात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर याप्रकरणी डिसेंबर महिन्यात सुनावणी पार पडली होती. याबाबतचा निकाल त्यावेळी न्यायालयाने राखून ठेवला होता. अखेर आज कोर्टाने निकाल देत महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना परवानगी दिली आहे.

कोर्टाच्या या परवानगी नंतर राजकीय नेते मंडळींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्वांचं यश आहे. आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस असून सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. याबाबत मी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचे शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानतो. सरकारने सकारात्मक निर्णय दिल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या, संघटनांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे सगळं शक्य झालं. असं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं .