Infinix Hot 20 5G फोनवर मिळावा जबरदस्त डिस्काउंट, स्टॉक संपण्यापूर्वी करा खरेदी

Infinix Hot 20 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Infinix Hot 20 5G : गेल्या वर्षीपासून भारतात 5G सेवा लाँच झाली आहे. ज्यानंतर मोबाइल कंपन्याही वेगाने 5G स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. मात्र 5G इंटरनेट स्पीडचा फायदा घेण्यासाठी 5G स्मार्टफोन असणे खूप महत्वाचे आहे. 5G एनेबल स्मार्टफोन नसलेल्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही.

Infinix Hot 20 5G phone to launch in india under 12000 with 6000mAh Battery  and 12 5g bands

आता मोबाइल कंपन्या बजेट सेगमेंटमध्ये 5G स्मार्टफोन आणत आहेत. नुकताच बाजारात असाच एक स्वस्त फोन लाँच झाला आहे. त्याचे नाव आहे Infinix Hot 20 5G. ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जातो आहे. या 5G डिव्हाइसवर सुमारे 38% सवलत दिली जात आहे.

Infinix HOT 20 Play, HOT 20 5G launched in India: price, specifications

Infinix Hot 20 5G या फोनची मूळ किंमत सुमारे 18,000 रुपये आहे. याच्या 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे, मात्र फ्लिपकार्टवर डिस्काउंटनंतर हा फोन 10,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. तसेच, ग्राहकांना अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड किंवा IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड वापरून EMI ट्रान्सझॅक्शनवर अतिरिक्त 10% सूट देखील मिळू शकेलं. त्याच वेळी, ग्राहकांना Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट करून 5% कॅशबॅक देखील मिळेल.

Infinix HOT 20 Play and HOT 20 5G launched in India starting at an  introductory price of Rs. 8999

अशा प्रकारे बँक ऑफर्सचा फायदा घेऊन ग्राहकांना 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Infinix Hot 20 5G फोन खरेदी करता येईल. इतकेच नाही तर फ्लिपकार्टकडून यासाठी एक्सचेंज ऑफरही दिली जात ​​आहे. आपला जुना फोन एक्सचेंज करून ग्राहकांना 10,400 रुपयांपर्यंत सूटही मिळेल. मात्र, ही सवलतीची रक्कम आपल्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते.

Infinix Hot 20 5G series will be launched in India on this day, know from  price to features - Gearrice

फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास Infinix Hot 20 5G फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD + LCD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यामध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आहे. तसेच हा फोन ब्लास्टर ग्रीन, रेसिंग ब्लॅक आणि स्पेस ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन Android 12 बेस्ड XOS 10.6 सॉफ्टवेअर काम करेल. तसेच या फोनमध्ये एक डेडिकेटेड मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.

Infinix Hot 20 5G - Specifications, Price in India, Launch Date

कॅमेऱ्या बाबत बोलायचे झाल्यास Infinix Hot 20 5G मध्ये फोटोग्राफीसाठी 50MP मेन कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. यासोबतच 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. तसेच सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरसोबत फेस अनलॉकचा पर्यायही देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/infinix-hot-20-5g-space-blue-64-gb/p/itm6646cdd2ff265

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ